नाशिक २५ ऑक्टोबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव येथे भाजपाने सुपरवॉरीयर्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात केले होते. यासाठी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येथिल छत्रपती संभाजी नगर रोड वरील श्री सप्तशृंगी कार्यालय येथे पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक प्रमुखांची चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत विविध पदाधिकाऱ्यांवर संबधीत लोकसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. तसेच बूथ अभियान राबविणे, नवीन मतदार नोंदणी मोहीम राबविणे, सोशल मीडियाचा वापर करणे, मन की बात, टिफिन डब्बा, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, संविधान दिन, संत महंत विभूतींचे स्मरण दिन या सह भाजपा स्थापना दिन आणि महामानवांच्या जयंती कार्यक्रम राबविणे या बाबत माहिती देण्यात आली.
घराघरात जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त अधिक जागा निवडून आणू असा विश्वास भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला. केंद्रात मोदींनी आणि राज्यात देवेंद्रजी यांनी अनेक विकास कामे केली आहे या अनुशंगाने येत्या २०२४ मध्ये एकच आहे की, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता लोकसभा महत्वाची आहे. त्यामुळे जागा कोणाला जाणार हे महत्वाचे नाही तर विजय महत्वाचा आहे. असे त्यांनी सांगितले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी महामंत्री यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, राजेंद्र गावित,जयश्री दौंड,संजय सानप, राजाभाऊ बनकर,पंकज खताळ, गणेश शिंदे,यांच्या सह नांदगाव मनमाड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे