नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३ : व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप शर्मा यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते.
यापूर्वी जानेवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. आणि आज जमीन मंजूर झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्याबाहेर जिलेटिनच्या कांड्या स्फोटकांमध्ये वापरल्या जाणार्या भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेनची असल्याचं नंतर तपासात निष्पन्न झाल. ६ मार्च रोजी मनसुख हिरेनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला होता. एनआयएने दावा केला आहे की, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हा या घटनेचा मास्टरमाइंड आहेत.
एनकाऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना आज सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस बोप्पना यांच्या नेतृत्त्वातील न्यायपीठाने त्यांना जामीन मंजूर केला व्यायसायिक मनसूख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण-
मुंबई पोलिसांना २५ फेब्रुवारीला संध्याकाळी जवळपास ३ वाजता जिलेटिनने भरलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओचे मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या बाहेर उभी सापडली होती. स्कॉर्पिओमध्ये एक धमकीचे पत्रही होते. CCTV फुटेजच्या तपासात समोर आले की, ही गाडी रात्री एक वाजता पार्क करण्यात आली होती. ५ मार्चला या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह कळवा येथील खाडीमध्ये आढळला होता. पोलिसांनी आधी ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते आणि नंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास ATS ला सोपवला.
ATS ने यामध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणात माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरेला अटक केली. यानंतर NIA ने न्यायालयाच्या माध्यमातून ही केस ATS कडून आपल्या हातात घेतली आणि आता या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. मुंबई पोलिस दलातील तत्कालीन सहायक निरीक्षक सचिव वाझे याने मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी प्रदिप शर्मा यांना ४५ लाख रूपये दिले होते, असे प्रतिज्ञापत्र ‘राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘ने न्यायालयात दाखल केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेच्या काही दिवसांनीच म्हणजे ५ मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे