टेंभुर्णी जि. प. सदस्या अंजनादेवी पाटील व जिल्हा दुध संघाचे मा. सं. शिवाजीराव पाटील यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी

5

माढा, १८ ऑक्टोबर २०२०: संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने सलग दुस-या वर्षीसुध्दा संकट निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे भिमानदीला महापुर आल्यामुळे नदीकाटच्या गावातील शेतीचे एकही पीक हाताला लागणार नसून शेतकऱ्यांचे कबंरडे मोडले आहे.

यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता ठोस निधीची तरतूद करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या अंजनादेवी पाटील यांनी निवेदना व्दारे मागणी केली आहे. टेंभुर्णी जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रस्ते (ओढे), पिके ,शेती, विज विद्युत पुरवठा यांचे भरपुर नुकसान झाले आहे. सलग दोन वर्षे होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

या सर्वांची माहीती घेऊन आमदार बबन दादा शिंदे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,पालमंत्री मा. दत्तात्रय भरणे ,जिल्हा अधिकारी यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी निवेदन देवून कळविण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा