आधार कार्डशिवाय मिळणार तात्पुरता आरटीई प्रवेश; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२३ : प्रवेशावेळी एखाद्या बालकाचे आधार कार्ड नसले तरी प्रवेश मिळणार आहे; मात्र हा प्रवेश तात्पुरता मिळणार आहे. प्रवेश मिळाल्यानंतर त्या बालकांच्या पालकांना आधार कार्ड शाळेत जमा करावेच लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी ही ऑनलाइन सोडत काढली जाते.

एखाद्या बालकाचे आधार कार्ड नसल्यास ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. आधार कार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, अशा काही शंकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शन मागविले होते. यावर प्रवेशावेळी एखाद्या बालकाचे आधार कार्ड नसले तरी प्रवेश मिळणार आहे.

प्रवेश मिळाल्यानंतर त्या बालकांच्या पालकांना आधार कार्ड शाळेत जमा करावेच लागणार आहे. आधार कार्ड न दिल्यास काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊ शकतो आणि प्रतीक्षेतील मुलास तेथे संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड वेळेतच काढून ठेवणे आवश्यक असल्याबाबतचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा