मुंबई, 17 जून 2022: राज्यातील दहावी बोर्ड निकाल जाहीर करण्यात आलाय. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 96.94 टक्के उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल चांगला लागला आहे.
जाहीर झालेल्या निकालानुसार मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण 96.06% तर मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण 97.96% आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बोर्डाने सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला. मार्कशीट डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.
येथून डाउनलोड करा रिझल्ट
https://ssc.mahresults.org.in/
https://mahresult.nic.in/
विभागीय मंडळ निहाय निकाल
पुणे: 96.16
नागपूर: 97
औरंगाबाद: 96.33
मुंबई: 96.94
कोल्हापूर: 98.50
अमरावती: 96.81
नाशिक: 95.90
लातूर: 97.27
कोकण: 99.27
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे