टीईटी नापास शिक्षकांची जाणार नोकरी

मुंबई : राज्य सरकारने वर्ष २०१३ नंतर सेवेत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची अट घालून नियुक्ती दिली होती.
शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर टीईटी उत्तीर्ण नसतानाही अनेक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती.
मात्र आता टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.
त्यामुळे टीईटी नसलेल्या शिक्षकांना नोकरीस मुकावे लागणार आहे.
शासनाच्या २००९ च्या आरटीई अटीनुसार शिक्षक होण्यासाठी पदवीसोबतच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असावी असा नियम करण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा