PBKS vs GT, 9 एप्रिल 2022: IPL 2022 च्या 16 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) ने पंजाब किंग्स (PBKS) चा 6 गडी राखून पराभव केला. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला तो राहुल तेवतिया, त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईतील ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोघांमध्ये हा सामना झाला.
गुजरात टायटन्स डाव: 20 षटके (190/4)
गुजरातची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी चौथ्या षटकात मॅथ्यू वेडची (6 धावा) विकेट गमावली. यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने 101 धावांची भागीदारी करत डावाला धार दिली. गिलने 59 चेंडूत 96 धावांची खेळी खेळली, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. साई सुदर्शननेही 30 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. ओडिअन स्मिथने टाकलेल्या सामन्याच्या शेवटच्या षटकात गुजरातला 19 धावा कराव्या लागल्या.
पहिली विकेट: मॅथ्यू वेड 6 धावा (32/1)
दुसरी विकेट: साई सुदर्शन (133/2)
तिसरी विकेट: शुभमन गिल 96 धावा (170/3)
चौथी विकेट: हार्दिक पांड्या 27 धावा (172/4)
पंजाब किंग्ज डाव: 20 षटके (189/9)
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने नऊ गडी गमावत 189 धावा केल्या. पंजाब किंग्जसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर शिखर धवनने 35 आणि जितेश शर्माने 23 धावांचे योगदान दिले.
राहुल चहरनेही अखेरच्या षटकात नाबाद 22 धावांची तुफानी खेळी केली. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. दर्शन नळकांडे यांना दोन, तर शमी, फर्ग्युसन आणि हार्दिक यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.
पहिली विकेट: मयंक अग्रवाल 5 धावा (11/1)
दुसरी विकेट: जॉनी बेअरस्टो 8 धावा (34/2)
तिसरी विकेट: शिखर धवन 35 धावा (86/3)
चौथी विकेट: जितेश शर्मा 21 धावा (124/4)
पाचवी विकेट: ओडियन स्मिथ 0 धावा (124/5)
सहावी विकेट: लियाम लिव्हिंगस्टोन 64 धावा (153/6)
7वी विकेट: शाहरुख खान 15 धावा (154/7)
आठवी विकेट: कागिस रबाडा, 1 धाव (156/8)
9वी विकेट: वैभव अरोरा 2 धावा (162/9)
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (डब्ल्यूके), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे