बिहार, १० ऑगस्ट २०२२: अखेर बिहारमध्ये जेडीयूचा काडीमोड झाला आणि आता बिहारमध्ये कोण येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती. या सगळ्या प्रकरणावर अखेर पडदा पडला आणि आज नितीश कुमार यांनी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी घेतलेली ही आठवी शपथ आहे. यावेळी तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे.


काँग्रेस आणि जेडीयूचं सरकार आता बिहारमध्ये स्थापन झालं. काँग्रेसला चार मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार काँग्रेसने मंत्रीपदाव्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षपदाचीदेखील मागणी केली होती. मात्र यासाठी नितीश कुमार यांनी नकार दिला.
बिहारमध्ये सत्तेस्थापनेआधी भाजपने धरणे आंदोलन केलं. यावर भाजप नेते सुशील मोदी यांनी सांगितलं की, आमच्या जास्त जागा असता देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. तर ज्यांनी आम्हाला धोका दिला, त्याचे परिणाम ते भोगत आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
शपथविधीनंतर लवकरच नितिश कुमार बैठक बोलावणार आहे. भाजपच्या काडीमोडवर नितिश कुमार म्हणाले की, २०२५ मध्ये मुख्यमंत्रीपदावर आम्ही राहणार की नाही, हे जे बोलत आहे, त्यांना बोलू द्या. वेळ आणि काळ यावरचे औषध आहे.
आता भाजपला बिहारमध्ये बसलेला धक्का ही निवडणुकीच्या क्षेत्रातली मोठी घडामोड आहे. त्यामुळे जर हेच सत्र सुरु राहिलं तर भाजपला अजून पुढे काय काय भोगावं लागेल, हे सांगता येणं कठीण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस