मनमोहन सिंग यांच्या सारख्या पंतप्रधानांची देशाला गरज: राहुल गांधी

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२०: भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे, मनमोहन सिंग यांचे स्मरण करून राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्यासारख्या पंतप्रधानांची कमतरता देशाला भासत अाहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, ‘आज देशाला अशा पंतप्रधानांची गरज आहे ज्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सारखी समज असेल. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा पुढील काळ सुखदायी जावो.

२६ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. मनमोहन सिंग हे त्यांच्या साधेपणामुळं देशातील इतर पंतप्रधानांपेक्षा वेगळे आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात ज्यांनी १९९० च्या दशकात उदारीकरण धोरणांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर आणलं होते .

डॉ. मनमोहन सिंग, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे पीएचडी असलेले पी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि १९९१-१९९५ दरम्यान देशाची अर्थव्यवस्था संकटापासून वाचली. असं म्हटलं जातं की, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांच्या दिशेनं बरीच मोठी आणि महत्त्वपूर्ण पावलं उचलली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा