सरकारने सुरु केली एसएमएसद्वारे शून्य जीएसटी विवरणपत्र भरण्याची सुविधा

नवी दिल्ली, दि. ९ जून २०२०: करदात्यांच्या सोयीसाठी  महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना सरकारने कालपासून एसएमएसद्वारे फॉर्म जीएसटीआर -३ बी मध्ये शून्य वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मासिक विवरणपत्र भरायला परवानगी दिली आहे. यामुळे २२ लाखांहून अधिक नोंदणीकृत करदात्यांसाठी जीएसटी अनुपालन सुलभ होईल.

आतापर्यंत सामायिक पोर्टलवर त्यांना त्यांच्या खात्यात लॉगइन करावे लागत होते आणि दरमहा विवरणपत्र भरावे लागत होते. आता, शून्य दायित्व असलेल्या करदात्यांना जीएसटी पोर्टलवर लॉगइन करण्याची आवश्यकता नाही , एसएमएसद्वारे ते त्यांचे शून्य विवरणपत्र  दाखल करू शकतात.

यासाठी, एसएमएसद्वारे Nil FORM GSTR-3B दाखल करण्याची कार्यक्षमता जीएसटीएन पोर्टलवर तत्काळ प्रभावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जीएसटी पोर्टलवर जीएसटीआयएन खात्यात लॉगइन करून

सर्व्हिसेस > रिटर्न्स> ट्रॅक रिटर्न स्टेटस नेव्हिगेशन करून विवरणपत्रांची सद्यस्थिती जाणून घेता येते. एसएमएसद्वारे शून्य रिटर्न भरण्याची प्रक्रिया वर दिलेल्या तक्त्या मध्ये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा