हाथरस प्रकरणातील चौकशीसाठी सरकारनं स्थापन केली एसआयटी

हाथरस, १ ऑक्टोबर २०२०: हाथरसच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या निर्देशांविषयी स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाथरसच्या घटनेवर चर्चा केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असं त्यांनी ट्विट केलं आहे.

योगी सरकारनं एसआयटीची स्थापना केली

वास्तविक, बलात्कार पीडितेचा मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पीडितेचा मृतदेह पोलिसांनी हाथरस येथे हलवला. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिल्लीतून मृतदेहाला हालवण्यापूर्वी पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मागणीला न जुमानता परस्पर मृतदेह हाथरस मध्ये नेला.

तेथे रात्रीच्या सुमारास त्यांनी परस्पर तिचा अंत्यसंस्कार देखील केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी वारंवार पोलिसांना आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली होती. मात्र, दोनशेच्या आसपास संख्या असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी जागेला घेराव घातला होता व तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आता योगी सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केलीय.

गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटीत डीआयजी चंद्र प्रकाश आणि आगरा पीएसीच्या कमांडर पूनम असतील. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी’ला घटनेच्या तळाशी जाऊन त्याचा तपास अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, या घटनेत सामील झालेल्या चार आरोपींना अटक करण्यात आलीय. त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं की, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यात आलं आहे व दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.

तब्बल १६ दिवस देत होती मृत्यूशी झुंज

हाथरसच्या चांदपा भागातील बलात्कार पीडित युवती तब्बल सोळा दिवसानंतर मृत्यूशी सुरू असलेली आपली झुंज हरलीय. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता तीनं दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रात्री तिच्यावर हाथरस मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना तुरूंगात पाठविलं आहे. रात्री उशिरापर्यंत पीडितेचा मृतदेह हाथरस मध्ये पोहोचला नव्हता. या दरम्यान तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं देखील केली. स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणात कडक चौकशी करून आरोपींना फासावर देण्याची मागणी देखील करण्यात येतेय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा