होरायझन असोसिएशनने केली गरजूंची मदत

पुणे, दि.१०मे : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी या लॉकडाऊनमध्ये अनेक संघ समोर येऊन होईल तशी मदत करत आहेत. शासन आणि जनता एकत्रित कोरोनाविरुद्ध लढा देत आहे.

नागरिकांना ब-याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी गरजूंची मदत करण्यासाठी लोक स्वत: हून पुढे येऊन कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

होरायझन असोसिएशनने कोरोनाच्या या काळात गरजू नागरिकांचा विचार करत बरेच उपक्रम हाती घेतले आहेत. गरजू लोकांच्या समस्यांचा विचार करत अन्न वाटप, रेशन कीट वाटप तसेच सॅनिटरी नॅपकिन (प्रत्येक स्त्री ३ पॅकेट) देखील त्यांनी वाटप केले.
कर्तव्यालाच भवितव्य मानणाऱ्या
डॉक्टर्स आणि त्यांसमवेत वैद्यकीय क्षेत्रातील कोविड-१९ विरुद्ध शौर्याने लढा देणाऱ्या सर्व योद्धांना पाठबळ देण्यासाठी होरायझन असोसिएशन प्रयत्न करत आहे.

आपण सर्वजण याच युद्धांमुळे आपापल्या घरी सुखरूप आहोत. होरायझन असोसिएशन याच योद्धांना पाठिंबा देण्यासाठी आर्थिक मदत करू इच्छित आहे आणि यासाठीच सर्वांना जमेल तेवढा आर्थिक पाठिंबा देण्यासाठी आवाहन करत आहे.

होरायझन असोसिएशने IME म्हणजेच भारतीय वैद्यकीय संघटना ला २००० पिपिई किट्सची मदत करत आहे. तरी यापुढे जसा प्रतिसाद मिळेल, तशी या संख्येत वाढ होईल. या सर्वासाठी नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आवाहन होरायझन असोसिएशनद्वारे केले जात आहे.
मदत करण्यासाठी इच्छूक नागरिकांनी
७७०९०३१७३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा