खाकी वर्दीतील माणूस बनला मुक्या जीवाचा अन्नदाता

7

पुणे, दि.८ मे २०२०: सध्या कोरोना महामारीचा सामना संपूर्ण देशाला करावा लागतो आहे. त्यात नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेला महत्वाचा घटक म्हणजे पोलीस प्रशासन.

या कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासन आपली तहान भूक विसरून नागरिकांसाठी दिवसरात्र जनजागृती करताना दिसत आहे. मात्र या वर्दीतही माणुसकी दडलेली असते, हे आपल्याला विसरता येणार नाही, कारण जसे पोलीस माणसाचा विचार करताना दिसत आहे. तसे या मुक्या जीवांकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मात्र पुण्यातील अशाच एका पोलिसाच्या वर्दीतही त्याने माणूसपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मुक्या जीवांना तो खायला घालताना पहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना पहायला मिळत आहे. त्या पोलीस वर्दीतील अवलियाचे नाव आहे अजित टेंभेकर.

अजित टेंभेकर हे शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. वर्दीवर असताना त्यांना एक मुका जीव खाण्यासाठी तडफडत असताना दिसला.त्यामुळे त्यांनी आपल्या हातात अन्न ठेवून त्या मुक्या जीवाला खाऊ घातले. अशा प्रकारे अनेक मुक्या जीवांचा उदरनिर्वाह करत आहेत. या व्हिडिओमधून त्याने मुक्या जीवांविषयी असलेली आस्था दाखवून दिली आहे.

सध्या लॉक दाऊनमुळे माणसांप्रमाणे मुक्या जीवांचेही हाल होताना आपल्याला दिसत आहे. त्यात हा व्यक्ती मुक्या जिवांसाठी करत असलेले कार्य अभिनंदनीय आणि आदर्शवत असे आहे. या व्हिडिओत ही व्यक्ती एका खारूताईला आपल्या जवळ बोलावून खाऊ घालताना दिसत आहे. त्यामुळे तो व्हिडीओ अजूनच मनाला भावतो. कर्तव्यावर काम करत असताना मुक्या प्राण्यांना फार कमी जणांना जमते. मुक्या जीवांची भूक भागवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ते करत असलेल्या या खाकी वर्दीतील अन्नदात्याला सलाम..

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा