नवीन Tata Nexon एका चार्जमध्ये ४३७ किमी धावणार, मिळणार हे फीचर्स

पुणे, ३ सप्टेंबर २०२२: टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही जेट एडिशन देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर आणि सफारीचे जेट एडिशन लाँच केले. आता Nexon ची जेट एडिशनही बाजारात आली आहे. कंपनीने याला Nexon EV Prime आणि Nexon EV Max या दोन प्रकारात आणले आहे. टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी मोठ्या बॅटरी पॅकसह Nexon EV Max लॉन्च केली होती.

टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईव्ही जेटची सुरुवातीची किंमत रु.१७.५ लाख एक्स-शोरूम आहे. XZ+ लक्स प्राइम जेटची किंमत रु. १७.५ लाख, XZ+ लक्स मॅक्स जेटची किंमत रु. १९.५४ लाख आणि रेंज-टॉपिंग मॉडेलची किंमत रु. २०.०४ लाख आहे. सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. Nexon EV हे भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक आहे.

२०२२ च्या Tata Nexon EV जेट एडिशनचे डिझाइन आणि लूक आधी लॉन्च केलेल्या जेट एडिशनसारखेच आहे. कंपनीने Nexon EV जेट स्टारलाईट रंगात आणली आहे. गाडीला अर्थी ब्रॉन्ज, प्लॅटिनम सिल्व्हर रूफचा ड्युअल टोन मिळेल. तसेच, नवीन Nexon Jet Edition मध्ये १६-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतील.

Tata Nexon EV Jet Edition EV Max 40.5 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. ही गाडी २५०Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जमध्ये ४३७ किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. तसेच, ही गाडी फक्त ९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

त्याच वेळी, Nexon EV प्राइम एका चार्जवर 312 किमी प्रवास करू शकते. ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी ९.९ सेकंद लागतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या कार मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, मल्टी-मोड रिजन, ज्वेल कंट्रोल नॉब, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस मोबाइल चार्जर यांसारख्या फीचर्ससह येते.

Tata Nexon EV च्या जेट एडिशनचे केबिन पियानो ब्लॅक फिनिश थीमसह येते. मेकॅनिकल देखील पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. Nexon EV Jet Edition मध्ये, डॅशबोर्ड आणि दरवाजाच्या पॅनल्सवर ब्रॉन्ज ट्रिम दिसेल. दुसरीकडे, लेदर डोअर पॅड नवीन ग्रॅनाइट ब्लॅक कलरमध्ये ठेवण्यात आला आहे.

विक्रीचे आकडे पाहता, ऑगस्ट २०२२ मध्ये टाटा मोटर्सने ३,८४५ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत यात घट झाली आहे. जुलैमध्ये टाटा मोटर्सने एकूण ४,०२२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये Nexon EV Prime, Nexon EV Max आणि Tigor EV यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा