मुंबईत आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू, या ठिकाणी होणार लसीकरण

मुंबई, १ मार्च २०२१: देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होत आहे. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे आणि २० गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल. त्याचबरोबर मुंबईने ही आपली ह्या मोर्चावर कंबर कसली आहे. कारण कोरोनाने राज्यात पुन्हा धोकादायक रूप धारण केले आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, सर्व खासगी रुग्णालयांची बैठक पूर्ण झाली असून यामध्ये सर्व पुढे येतील अशी बीएमसीला आशा आहे. बीएमसीचे म्हणणे आहे की सार्वजनिक आरोग्य योजना तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजना राबविणाऱ्या खासगी रुग्णालयांना या लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले जाईल.

महानगरपालिका / शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक डोससाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल. लससाठी १५० रुपये आणि सर्व्हिस चार्जसाठी १०० रुपये द्यावे लागतील. जन आरोग्य योजना आणि केंद्र किंवा राज्य आरोग्य विमा योजना राबविणार्‍या ५३ रुग्णालयांची यादी केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे. २ मार्च २०२१ पासून इतर १९ महानगरपालिकांमधील लसीकरण केंद्रांवर विनामूल्य लसीकरण दिले जाईल.

सरकारी रुग्णालये

१- बीकेसी जंबो कोविड सेंटर, वांद्रे
२- मुलुंड जंबो कोविड सेंटर, मुलुंड
३- नेस्को जंबो कोविड सेंटर, गोरेगाव
४- सेव्हन हिल हॉस्पिटल, अंधेरी
५- दहिसर जंबो सेंटर, दहिसर

खाजगी रुग्णालय

१- एचजे दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर २
२- केजी सौम्य मेडिकल कॉलेज
३ – एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, महालक्ष्मी

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा