अकरावी प्रवेशाची विशेष फेरी आता लांबणीवर, असे आहे सुधारित वेळापत्रक

7
मुंबई, २५ डिसेंबर २०२०: अकरावी प्रवेश प्रक्रिया संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अकरावी प्रवेशाची विशेष फेरी आता लांबणीवर पडली आहे. अकरावी फेरीच्या विशेष कालावधीत आता वाढ करण्यात आली आहे. एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज बदल करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला वर्ग यातून प्रवेश घेण्यासाठी संकेस्थळावर सुविधा देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रवेश घेतले आहेत. मात्र, आता रद्द करायचे आहेत, अशांना ते या फेरीत रद्द करता येणार असून लगेचच विशेष फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.
विशेष फेरीची गुणवत्ता यादी २८ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येतील. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रवेशात अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
• २८ डिसेंबरला अकरावीची विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार.
• ३१ डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करता येईल
• बीई, बी टेक, बी फार्मसी साठी अंतिम अर्ज भरण्याची तारीख ३० डिसेंबर असेल.
• एमबीए, एमएमएच साठी अंतिम अर्ज भरण्याची तारीख २९ डिसेंबर असेल.
• एमसीए साठी अंतिम अर्ज भरण्याची सुधारित तारीख २९ डिसेंबर असेल.
• बी आर्किटेक्चर साठी अंतिम अर्ज भरण्याची तारीख २९ डिसेंबर असेल.
• एलएलबी ५ वर्ष, एलएलबी ३ वर्ष आणि बीएड साठी अंतिम अर्ज भरण्याची तारीख ३१ डिसेंबर असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा