मुंबई, १५ जानेवारी २०२३ : मुंबई मॅरेथॉन ही जगातील टॉप-१० मॅरेथॉनपैकी एक आहे. ही शर्यत ६ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. अपंग लोकही मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पोचले आहेत, जिथे अपंग श्रेणीतील चॅम्पियन्सची शर्यत होणार आहे. २०२० नंतर प्रथमच मुंबईत मॅरेथॉन शर्यत सुरू झाली आहे.
हाफ मॅरेथॉन वगळता टाटा मुंबई मॅरेथॉनच्या इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून सुरू झाल्या. कोरोना महामारीमुळे २०२१ आणि २०२२ मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन होऊ शकले नाही. यावेळी मॅरेथॉनबाबत लोकांमध्ये अधिक उत्साह आहे. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी ५५ हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली असून, त्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी ३,६०० हून अधिक पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत. दिव्यांग लोकही मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पोचले असून, त्यांना वेगळी शर्यत द्यावी लागणार आहे. पूर्ण मॅरेथॉन जी ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, ड्रीम्स रन ६.६ किमी, ज्येष्ठ नागरिक ४.७ किमी, चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी कॅटेगरी रेस २.१ किमी आणि खुली १०किमी रन असेल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड