पुणे, २७ जून २०२० : आज भारत चीन सीमेवर तणाव वाढत अाहे. आपल्या सैन्यातील २० जवान शहिद झाले. चीन विरूद्ध प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. अनेक ठिकाणी चीनी वस्तूंची होळी केली जात आहे. याच काळात सोशल मिडियावर देखील चीन विरूद्धचा आक्रोश दिसून येत आहे. हे सगळे सहज बघत असताना अचानक एक फोटो नजरेत पडला, त्यावर लिहले होते ” आझाद हिंद फौज ट्रेनिंग कैम्प, शांघाय “ते पाहिल्यावर कुतूहल वाटले की, आज एकीकडे भारत व चीन मध्ये जागेवरून वाद चालू आहे, आणि भारताची पहिली राष्ट्रीय सेना म्हणून ओळखल्या जाणा-या “आझाद हिंद फौजचे ट्रेनिंग कैम्प ” हे शांघाय मध्ये कसे ? मग याची माहिती घेण्याचे ठरवले त्यात जी माहिती कळली ती पुढीलप्रमाणे.
” चलो दिल्ली ” ” जय हिंद ” या घोषणामुळे आझाद हिंद फौज हि भारतीयांसाठी एक प्रेरणास्रोत होती . जनरल शाह नवाज खान हे एक परिचित बंगाली लेखक आहेत ज्यांनी त्यांच्या एका पुस्कात याचा उल्लेख केला आहे की , तिरंगा फडकत असलेली ही इमारत शांघाय गुरुद्वारा आहे. ही १९०८ साली बांधली गेली आहे.
भारतीय राष्ट्रीय लष्कराला आझाद हिंद फौज असेही म्हणतात. आझाद हिंद फौज (स्वतंत्र भारताची राष्ट्रीय सेना) म्हणून ओळखल्या जाणार्या सेनेमध्ये त्यावेळेस मोठ्या संख्येने पुरुष सामील होण्यासाठी पुढे आले. सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस आणि इतर बरेच नेते यावेळेस फौजेशी निगडीत होते. हे छायाचित्र १९४३-४५ च्या काळातील असून, नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया या भारत सरकारच्या नवर्गीकृत फाइल्स आणि नोंदींमध्ये संरक्षीत आहे.
शांघायच्या शीख समुदायाने गुरूद्वारेची ही इमारत आझाद हिंद फौजला ट्रेनिंग कैम्पच्या वापरासाठी स्वेच्छेने दिली होती. ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळविणे हे त्याचे उद्दीष्ट होते. आझाद हिंद फौज या नावाने ओळखल्या जाणार्या इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) ची स्थापना दक्षिण राष्ट्रवादी आशिया खंडातील ‘द्वितीय विश्वयुद्ध’ दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. दुसर्या महायुद्धात आझाद हिंद फौजने दोन सैन्य चकमकींमध्ये सहभागी घेतला होता.
संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी