लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजासाठी कायम पथदर्शक आहेत – प्रविण माने

इंदापूर, १ ऑगस्ट २०२०: आज थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या शंभराव्या जयंतीउत्सवाच्या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती इंदापूर यांच्यावतीने, आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या प्रतिमेस मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य मा. प्रविण माने यांनी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. साठे नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आज १५० श्रमिक कुटुंबांना आजच्या जयंती दिनाच्यानिमित्ताने गोड पुरण पोळीचा स्वयंपाक करण्यासाठी अन्नधान्य किटचे प्रविण माने यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

याचसह श्रीराम चौक, इंदापूर येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या स्मृतींस माने यांनी अभिवादन केले. लोकशाहीरांच्या या जयंती दिनाच्या निमित्ताने आज इंदापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात इंदापूर नगरपरिषद संचलित सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रंथालय येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथालयातील कार्यक्रमा प्रसंगी माने यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत, या ग्रंथालयास पुस्तके खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपये माने यांच्यावतीने देण्यात आले.

अण्णाभाऊंचे जीवन, त्यांचे विचार, उपलब्ध असलेली मुबलक साहित्यसंपदा समाजासाठी कायम पथदर्शक असून आपण त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रविण माने यांनी केले.

याप्रसंगी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अशोक मखरे सर, नारायण ढावरे, मयूर ढावरे, चंद्रकांत सोनवणे, दिलीप शिंदे, राजू शिंदे, बाळासाहेब अडसूळ, सतीश सागर, नंदू खंडाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, बापू अडसूळ, बाळासाहेब लोखंडे सर, ऊमेश ढावरे, अनिल ढावरे आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा