यूके, १६ मे २०२१: यूकेमधील कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात येणारी लस विषाणूचा बी 1.617.2 हा प्रकार संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचं समोर आलंय. यूके लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग असलेले अग्रगण्य शास्त्रज्ञ यांनी शनिवारी हा दावा केला. काही लोक म्हणतात की कोरोनाचा बी 1.617.2 प्रकार प्रथम भारतात आढळला.
वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनमध्ये एका आठवड्यातच कोरोनाचा बी 1.617.2 प्रकाराच्या प्रकरणांची संख्या दुपटीनं वाढलीय. अशा परिस्थितीत, ज्यामध्ये विषाणूचा हा प्रकार वेगानं पसरू लागला आहे, त्याची तपासणी आणि लसीकरण जलद गतीनं केलं जात आहे.
ब्रिटीश सरकार आकडेवारीच्या प्रतीक्षेत
ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या प्रकाराबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंथनी हार्देन म्हणाले की, यामुळं देश अनलॉक करण्याच्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात कारण हा प्रकार किती वेगवान होईल हे अद्याप स्पष्ट झालं नाही. कोरोनाच्या या नवीन प्रकारात लस कमी प्रभावी असू शकते असा दावाही त्यांनी केला.
तत्पूर्वी, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, सरकार अन्य आकडेवारींपेक्षा नवीन प्रकार अधिक पसरणार आहे का हे सांगणार्या आकडेवारीची वाट पाहत आहे. त्याच वेळी, ब्रिटिश आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की बी -1.617.2 प्रकार वायव्य इंग्लंड आणि लंडनमध्ये पसरला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे