छत्रपती संभाजीनगर १७ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील तिडका गावात होत असलेले १५ वित्त आयोगाचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थ वसीम पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. लवकरच पंधरा वित्त आयोगाच्या निकृष्ठ कामांची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी गावातील खोदलेल्या गटारी ह्या बऱ्याच दिवसापासून अर्धवट अवस्थेत पडून असल्या कारणाने नागरिकांना त्याचा नहाक त्रास होत असल्याचे सांगितले. याबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता ग्रामपंचायत त्यांना फार आडमुठे पणाने उत्तर देत असल्या कारणाने गावातील नागरिक संताप्त झाल्याची प्रतिक्रिया वसीम पठाण यांनी दिलेली आहे. पंधरा वित्त आयोगातून झालेला पूल बांधून पंधरा दिवस होत नाहीत तोच त्यावर मोठा खड्डा पडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी दर्शवून दिले आहे. हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यास आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे तिडका येथील ग्रामस्थ वसीम पठाण यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी