गटशिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या थेरपी कक्षाचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

परळी, २१ फेब्रूवारी २०२४ : गटशिक्षण अधिकारी कार्यालय परळी वैजनाथ येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या थेरपी कक्षाचे उद्घाटन दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष मा. डॉ. संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते आज गटसाधन केंद्र परळी वैजनाथ येथील दिव्यांग बहुउद्देशीय संसाधन केंद्र येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी गटसाधन केंद्र परळीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्रीराम कनाके हे उपस्थित होते. तर या दिव्यांग विद्यार्थी थेरपी कक्षाचे थेरपिस्ट मोहन मुळे, पमपालिया मॅडम तसेच समावेशीत शिक्षण विभागाचे विशेषतज्ञ श्री. विजय कचरे, श्री. बाळकृष्ण कदम, गटसाधनचे परळीचे वरिष्ठ लेखा बाळासाहेब बोंदर यांचीही उपस्थिती होती.

राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिव्यांग कल्याण मोहीम हाती घेतली आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग युवक, दिव्यांग महिला आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी विविध उपक्रमांची मांदीआळी त्यांनी सुरू केली. दिव्यांगाच दुःख म्हणजे आपलं दुःख मानून त्या दुःखाचं सुखात रूपांतर करण्यात सर्वात मोठं समाधान मानणारे डॉ. संतोष मुंडे यांनी बोलताना प्रथम या दिव्यांग थेरपी कक्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि या कक्षामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा सूचनाही या थेरपी कक्षाच्या विशेष तज्ञांना व विशेष शिक्षकांना दिल्या. तसेच पुढे बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिव्यांग विद्यार्थी थेरपी कक्षा प्रमाणेच स्वमग्न विद्यार्थ्यांसाठीही विशेष कक्ष निर्माण करून देऊ असा शब्द दिला आहे.

अशा या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या थेरपी कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी समवेशीत शिक्षण विभागातील विशेष शिक्षक श्री. जाफरी सर, सय्यद सर, व्यवहारे सर, सय्यद सर, पवार सर, काळे सर, बागवान सर, मुंडे सर तसेच या दिव्यांग कक्षाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक डॉ. छाया मुंडे ,डॉ.अनंत मुंडे, अनिता राऊत, माधुरी देशमुख, गोपाळ बियाणी, गोविंद कांबळे, कविता नंदिकोले, शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष तज्ञ विजय कचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षक पवार सर यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुन गित्ते

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा