“या” देशांमधे अजुनही कोरोनाचा शिरकाव नाही…..एक कोरोना केसही नाही….

पुणे, २३ नोव्हेंबर २०२०: संपूर्ण जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. मानव जातीच्या अस्तित्वाला धोका बनलेला हा विषाणु वर्षानुवर्षे मानवा बरोबर इथंच राहणार आसल्याचं जाणकारांचं मत आहे. आत्तापर्यंत जगभरातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोना चा एकमेव पर्याय म्हणजे लस ज्याचावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

कोरोनानं जगाचा कानाकोपरा जरी व्यापला आसला तरी जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथं कोरोनाचा शिरकाव झालेलाच नाही. अथवा तिथं कोरोनाचं नावसुध्दा माहिती नाही. दक्षिण प्रशांत महासागरातील टोंगा, किराबती, सामोआ, माईक्रोनेशिया आणि तुवलु हे छोटे द्वीपीय देश आहेत जिथे कोरोनाची एक केस देखील सापडली नाहीये.

कोरोनानं संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अमेरिकेपासून ते जापानपर्यंत सर्व देशांना लाॅकडाऊन करावं लागलं. मात्र, हे सगळं होऊन ही अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. पण, जगाच्या पाठीवर या इवल्याशा देशात कोरोना पोहचलेला नाही. मात्र, लवकरच यावर लस विकसित नाही झाली तर पुढं तिथं देखील हा व्हायरस पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा