पुणे, २७ जानेवारी २०२१: कोरोना विषाणु अजून ही पृथ्वीवर असून या महामारीशी संपूर्ण जगाचा लढा कायम चालूच आहे. तर लसीवरील काम झालं असून अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणला सुरवात झाली आहे. पण, या विषाणु वर संशोधन मात्र अजून ही सुरूच आहे आणि यामधून आणखी एक माहिती समोर आली आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. पण, त्यामधे मास्क घातल्यावर ही कोरोना होण्याचा खुलासा केला आहे. ही माहिती एका आभ्यासातून समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. तर कोरोना विषाणुला घेऊन अजून जागरूक राहण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.
कोरोनाचा संसर्ग खोकला, शिंकण्यातून होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, मास्क असून ही बोलताना अनेक लहान थेंब बाहेर पडतात. हे थेंब एअरसोल्स वातावरणात काही तास राहू शकतात आणि त्यातून संसर्ग होण्याची अधिक शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
मात्र, कोरोना जगभरात कुठेतरी निवळला असून आता कुठे सर्वसामान्य जनतेचे जीवन पुर्वपदावर येत आहे. मात्र, या सर्वात कोरोना विषाणु आपली रूपं बदलत असून नागरिकांच्या जिवाला धोका बनत चालला आहे. तर कोरोना लसीकरण सुरू झाले तरी अधिक काळ कोरोना मानवाबरोबर राहणार आसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव