पुणे ८ फेब्रुवारी २०२५:पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्याने PMPL बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी, प्रवाशांना अपुऱ्या बससेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.
गर्दीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोय होते. उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही, त्यामुळे अनेकांना तासनतास कोंडमाऱ्यात प्रवास करावा लागतो. बसमध्ये होणाऱ्या या गोंधळाचा परिणाम वेळापत्रकावरही दिसून येतो. PMPL बस वेळेवर थांबू शकत नाहीत, परिणामी प्रवाशांचे वेळापत्रक बिघडते.
नागरिक या समस्येबद्दल वारंवार तक्रारी करत असले तरी अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. बसची संख्या वाढविणे आणि सेवा सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलली गेली नाहीत, तर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडण्याची शक्यता आहे. PMPL प्रशासनाने या समस्येवर गंभीरपणे विचार करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे