देशातली यंदाची थंडी गोठवणारी असेल – मृत्युंजय महापात्रा

नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर २०२०: देशात यंदा कडाक्याची थंडी पडणार असा इशाराच भारतीय हवामान विभागानं दिला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वाचा आहे. सप्टेंबर ,ऑक्टोबर महिन्यात हवामानात उष्णता जाणवते आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी मात्र कडाक्याची थंडी पडणार. नागरिकांना सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याचे महासंचालक महापात्रा यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा नीनामुळे थंडी कडाक्याची असेल. वातावरणातील बदलांमुळे केवळ तापमानात वाढ झाली आहे, असे नाही तर त्यामुळे सर्व ऋतूंवर परिणाम झाला आहे. मृत्युंजय यांनी सांगितले देशात ऋतुंची दिशा ठरवण्यासाठी ला नीना आणि एल नीनो अत्यंत महत्त्वाचे आहेत. ला नीनाच्या प्रभावामुळे आपल्याला यंदा कडाक्याच्या थंडीला सामोरं जावं लागू शकतं.

‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी’नं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मृत्युंजय बोलत होते. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांत गारठुन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा