थोपटे समर्थकांची पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड

पुणे : भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये तोडफोड केली. सोमवारी(दि.३०) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात आमदार थोपटे यांनी स्थान न मिळाल्यानं त्यांचे समर्थक नाराज होते. त्यांनी मंगळवारी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये तोडफोड करून नाराजी व्यक्त केली.

भोर विधानसभा मतदार संघातून आमदार थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेतही त्यांनी भोरचा काँग्रेसचा गड राखला होता. यंदाच्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी हॅटट्रिक केली होती.
संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.

मोदी लाटेत देखील त्यांनी बाजी मारली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संग्राम थोपटे यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. मात्र अखेर संग्राम थोपटे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. काँग्रेसकडून १० आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना देखील मंत्रिपद देण्यात आले नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा