पालघर मध्ये आज पुन्हा हजारोंच्या संख्येने स्थलांतरित मजुरांची गर्दी

पालघर, दि. २१ मे २०२०: पालघरमध्ये मजुरांनी आज हजारोंच्या संख्येने गर्दी केली आहे. आज पालघर मधून एकूण तीन श्रमिक रेल्वेगाड्या रवाना होणार होत्या. परंतु त्यातील दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे स्थलांतरित मजुरांनी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असंतोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रचंड गोंधळ करत सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजवले.

आज पालघर मधून रवाना होणाऱ्या तीन रेल्वे गाड्या पैकी दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. त्यातील केवळ जोधपूरला जाणारी रेल्वे गाडी रवाना होणार आहे. यामुळे आर्यन मैदानावर गर्दी केलेल्या स्थलांतरित मजुरांनी प्रचंड गोंधळ घातला आहे त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र दिसून आले. प्रशासनासह आता पोलिसांची देखील तारांबळ उडालेली आहे. काल सुद्धा पालघर मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजही तीच परिस्थिती पुन्हा समोर उभी राहिली आहे.

मुंबई मध्ये देखील स्थलांतरित मजुरांची गर्दी:

आज मुंबईतून दोन वाजता उत्तर प्रदेश साठी एक रेल्वे गाडी रवाना होणार आहे. आपल्या गावी जाण्यासाठी चुनाभट्टी येथे स्थलांतरित मजुरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. शेकडो मजूर चुनाभट्टी येथे जमा झाले आहे. गावी जाण्याची ओढ असली तरीही मजुरांनी सोशल डिस्टन्सला केराची टोपली दाखवली आहे.

आज सकाळीच या स्थलांतरित मजुरांना चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मध्ये बोलवण्यात आले आहे. पोलिसांनी मजुरांना नेण्यासाठी विशेष बस देखील तैनात केल्या आहेत. या बसमधून या स्थलांतरित मजुरांना लोकमान्य टिळक टर्मिन्स येथे पोहचवण्यात येईल. दुपारी दोन वाजता उत्तर प्रदेश मधील गोंडा या जिल्ह्यासाठी ही रेल्वे गाडी धावणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा