तरूणांच्या तत्परतेने वाचले हजारो वन्यजीव

पुरंदर,दि. ९ मे २०२०: शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. संकटाच्या वेळी हे सुरक्षादल लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्याच बरोबर हेच सुरक्षादल निसर्गाच्या रक्षणासाठी  सुध्दा प्रयत्न करीत आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यरात्री डोंगराला लागलेली आग मठ्या प्रयत्नाने विजवली आहे. रात्रीच्या काळोखात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी आग विजवल्याने निसर्गाचे होणारे मोठे नुकसान  टळले आहे.

पुरंदर तालुका हा
डोंगरद-याचा तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात येथील डोंगराना वनवा लागण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. काल पिंगोरी येथील डोंगराला मोठी आग लागली होती. दुपारी लागलेली हि आग वनविभागाने विजवली. मात्र रात्री ११ वाजता ही आग पुन्हा भडकल्याचे लक्षात आले. यावेळी पिंगोरी गावचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील १५ तरूणांनी ही आग विजवून निसर्गाचे व वन्य जीवांचे होणारे नुकसान टाळले आहे.

सात ते आठ फुट उंच असलेल्या ज्वालांची आग जवानांनी मोठ्या धैर्याने विजवली. त्यामुळे  या तरूणांचे मोठे कौतुक करण्यात येत आहे. ही आग विजवण्यासाठी सिद्धार्थ शिंदे, दिनेश भोसले,  संभाजी  पवार, अक्षय चव्हाण, महेश शिंदे, प्रणव शिंदे, ओंकार शिंदे, किरण शिंदे, महेश शिंदे, शिवम शिंदे, रविंद्र शिंदे,अमोल शिंदे, राजेंद्र शिंदे,
त्यांना पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

बाळासाहेब गोलांडे( वनरक्षक जेजुरी )

पिंगोरी येथील डोंगराला काल मोठी आग लागली होती. जवळ पास पन्नास एकर  डोंगरावरील वनसंपदा यामध्ये नष्ट झाली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी ही आग विजवली. पण मध्यारात्री पुन्हा वणवा पेटला. यावेळी पिंगोरीतील ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी तो विजवला.  त्यामुळे मोठे नुकसान टळले आहेच, त्याच बरोबर वनविभागाला सुध्दा मोठी मदत झाली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या तरूणांनी वणवा विजवण्यासाठी मदत केली होती. लवकरच या तरूणांना   वनविभागाकडून शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येईल.

राहुल शिंदे (पोलिस पाटील, पिंगोरी )

पिंगोरी हे गाव डोंगरद-यांनी वेढलेले गाव आहे. अनेक वनऔषधी वनपस्पती येथे आहेत. वणव्यामुळे अशा वनस्पती नष्ट होतात. त्याच बरोबर अनेक प्राणी, पक्षी शुध्दा नष्ट होतात. हे होवू नये म्हणून ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून अनेक वेळा आग विजवली जाते. वन विभाग सुध्दा या भागात आग लागल्यास तातडीने येतो पण गावातच अशी यंत्रणा असल्यामुळे वणव्यावर तातडीने नियंत्रण आणणे शक्य होते. त्यासाठी या तरूणांची मोठी मदत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा