इंदापूर, दि. २८ मे २०२०: वाळवंटी टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय व जागतीक महत्वाची कीड आहे. नाकतोड्याच्या गटातील ही टोळ आपल्याकडे आढळते. वाळवंटी टोळ जी तांबुस रंगाची असते. ती अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहेत. त्यामुळे या किडीचा प्रतिबंध करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सामुहिकपणे करणे आवश्यक आहे असे तालुका कृषि अधिकारी सूर्यभान जाधव यांनी सांगितले.
टोळधाडीचे नियंत्रण व उपाय करण्यासाठी त्यांच्या अंडी घातलेल्याजागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होवून नियंत्रणात ठेवता येते. नीम तेल प्रति हेक्टरी २.५ लिटर फवारणी करावी, मिथील पॅराथीआन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी, भेंडी कार्ब ८० डब्ल्युपी, क्लोरोपायरीयाफॉस २० ईसी, ५० ईसी, डेल्टामेथ्रीन २.८ युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन २५ ईसी, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ ई.सी व १० डब्लूपी, मॅलाथिऑन ५० ईसी, २५ ईसी व ९५ युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोदणी समितीने केलेली आहे.
अधिक माहिती तथा मार्गदर्शनासाठी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या कृषीधनाचे नुकसान टाळावे असे आवाहन कृषी सहाय्यक प्रशांत मोहोळकर यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे