राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती

मुंबई, १४ डिसेंबर २०२२ : शिंदे-फडणवीस सरकारने सेवेतील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यानुसार राज्यातील पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तसेच अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • अमिताभ गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार

पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता यांना कायदा व सुव्यवस्था, अपर पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त असतील.

  • मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त

मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलीससह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलीस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे.

यासोबतच अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नविनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त असतील. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली झाली असून, नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी पिंपरी चिंचवडचे आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा