अर्जेंटिनाची गत उपविजेत्या क्रोएशियाचा धुव्वा उडवत फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

पुणे, ता. १४ डिसेंबर २०२२ : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या (फिफा विश्वकरंडक) सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने गत उपविजेत्या क्रोएशियाचा ३-० गोलने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह अर्जेंटिनाच्या संघाने आठ वर्षांनंतर फिफा विश्वकरंडकच्या फायनलमध्ये प्रवेश केला. विश्वकरंडकाच्या इतिहासात अर्जेंटिना आता सहाव्यांदा फायनल खेळणार आहे. १८ डिसेंबरला फिफा विश्वकरंडकचा फायनल सामना होणार आहे.

सेमी फायनलच्या पहिल्या हाफमध्ये क्रोएशियाने आक्रमक सुरवात केली; पण सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल नोंदविला. त्यानंतर पाचव्या मिनिटाला ज्युलिएन अल्वारेजने अफलातून गोल नोंदविला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने गोलचे ५ प्रयत्न केले, तर क्रोएशियाने ४ वेळा गोलचा प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक चेंडू क्रोएशियन संघाकडे ६२ टक्के आणि अर्जेंटिनाकडे केवळ ३८ टक्के होता.

मध्यंतरानंतर अर्जेंटिनाने आणखी एक गोल नोंदविला. ६९ व्या मिनिटाला मेस्सीने अल्वारेजकडे पास टाकला आणि अल्वारेजने कोणतीही चूक न करता गोल केला. अल्वारेझनेही मिळालेल्या संधीचे सोने करीत आपला दुसरा, तर संघासाठी तिसरा गोल केला. क्रोएशियाच्या संघाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा