गोल पोस्ट राजकारण तृप्ती देसाईंना धमकवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

तृप्ती देसाईंना धमकवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे: भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना धमकवल्या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर ‘स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे बच्चू कडू हे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात आंदोलन का करत नाही’ ही पोस्ट ३१ऑक्टोबर ला लिहिली होती.
तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांना शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहून पोस्ट केली होती. त्यानंतर बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यात फोनवरून संवाद झाला.फोनवरूनच त्यांच्यात वाद झाला.त्यानंतर तृप्ती देसाई यांनी बच्चू कडू यांनी धमकवल्याची तक्रार केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version