मुंबई, १ मे २०२१: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लर्शीच्या मोजकाच मात्रांचा पुरवठा नुकताच प्राप्त झालाय. या अनुषंगानं आज दि. १ मे २०२१ रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ कोविन अॅप मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.
भविष्यात लर्शीच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं परिपूर्ण पालन करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्तानं करण्यात आलंय.
यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे त्या पाच रुग्णालयांची नावं पुढील प्रमाणं:
१. बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी ( घाटकोपर परिसर)
३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे