राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजांच्या ऊर्जा चरण पादुकांचे वडगाव मावळमध्ये उत्साहात आगमन!

Vadgaon Maval Welcomes Acharya Anand Rishiji’s Energy Padukas
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी;

Vadgaon Maval Welcomes Acharya Anand Rishiji’s Energy Padukas: वडगाव मावळमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रसंत आचार्य भगवंत श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या भारतातील पहिल्या १४ शुभचिन्ह असलेल्या ऊर्जा चरण पादुकांचे वडगाव मावळ येथे नुकतेच आगमन झाले. या पवित्र पादुकांच्या आगमनाने संपूर्ण जैन समाजात आनंदाची लहर पसरली आहे. दर्शन आणि जप विधी जैन स्थानक येथे भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले.

या प्रसंगी श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुनील बाफना, प्रेमराज बाफना, राजेश बाफना, अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र एस. बाफना, झुंबरलाल कर्नावट, विजय बलदोटा, मोतीलाल बाफना, कांतीलाल बाफना, दिलीप मुथा, अमोल बाफना, रोहन मुथा, मनोज बाफना, रमेश गुजराणी, अमित मुथा, प्रतीक सुराणा, राजेंद्र जैन, साहिल बाफना, सुवालाल कुंकूलोळ, गौरव बलदोटा, सहज बाफना आदींनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन पादुकांचे दर्शन घेतले.

या आगमनानिमित्त वडगाव मावळमधील जैन समाजाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या प्रास्ताविकाने झाली. झुंबरलाल कर्नावट आणि प्रीती बाफना यांनी मधुर स्वागतगीत सादर केले. तर माजी नगरसेवक भूषण मुथा यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.

१४ शुभचिन्हांनी सुशोभित ऊर्जा चरणांची भव्य मिरवणूक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्रिशूळ, अंकुश, त्रिकोण, मत्स्य, नक्षत्र, ध्वज, ऊर्ध्व रेखा, डमरू, पर्वत, पद्म, स्वस्तिक, देवज्ञ रेखा, मंदिर, पालखी या पवित्र चिन्हांनी युक्त असलेल्या आचार्य आनंद ऋषीजींच्या चरणांच्या प्रतिकृतीची जयघोष करत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. अखेरीस, राजेश बाफना यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. जैन स्थानकामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू होते, ज्यामुळे वडगाव मावळमध्ये एक आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या पवित्र पादुकांच्या आगमनाने वडगाव मावळच्या भूमीला खऱ्या अर्थाने पावन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे