जळगाव ९ एप्रिल २०२४ : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत पाडवा पहाट साजरी केली. आज वर्षातील मोठे पावन पर्व असलेला गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यातील पाडवा पहाट ही विशेष मानली जात असून यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी मात्र अतिशय अनोख्या आणि मानवतावादी प्रकारे पाडवा पहाट साजरी केली.
पाचोरा शहरातील आधारवड ही संस्था निराधारांना आधार देण्याचे काम करते. शहरासह परिसरातील अनेक निराधारांना येथे आश्रय मिळालेला आहे. वैशालीताईंनी आज पहाटेच आपल्या सहकार्यांसह आधारवड संस्थेतील निराधार स्त्री-पुरूषांना अन्नदानरूपी सेवा केली. यात खीर व बदाम शेकसह अनेक स्वादीष्ट खाद्यपदार्थांचा समावेश होता. लक्षणीय बाब म्हणजे वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वत: आग्रह करून खाद्यपदार्थ खाऊ घातले तेव्हा अनेकांना भावना उचंबळून आल्या. या माध्यमातून निराधारांचा गुढीपाडवा खर्या अर्थाने गोड झाल्याची भावना त्यांच्या चेहर्यावर दिसून आली.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आधारवड संस्थेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधतांना उपेक्षितांसाठी ते करत असलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आगामी काळात आपण संस्थेच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्या सोबत कमल ताई आर ओ पाटील, निधी नरेंद्र सिंग सूर्यवंशी, ज्येष्ठ शिवसैनिक राजूभाऊ काळे, अनिल सावंत शहर प्रमुख, एडवोकेट दीपक पाटील शहरप्रमुख, दादाभाऊ चौधरी, पप्पूदादा राजपूत, पप्पू जाधव, नामदेव चौधरी, संजय चौधरी, भूषण चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवा अधिकारी, मनोज चौधरी युवा शहर अधिकारी, हरीश देवरे युवा शहर अधिकारी अधिकारी, फकीरचंद पाटील, अतुल चौधरी सह समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम गायकवाड