विदर्भातील एकमेव महिला नकलाकार प्रा.डॉ.संगीता टेकाडे नारी गौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे ९ एप्रिल २०२४ : पुणे येथे मनुष्य विकास लोकसेवा अकादमी द्वारा आयोजित राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान सोहळा श्री स्वामी हॉल काथरूड येथे पार पडला. या सोहळ्या मध्ये प्रा.डॉ.संगीता टेकाडे विदर्भातील एकमेव महिला नकलाकार, नाट्य व सिनेकलावंत यांना गत ४० वर्षापासूनच्या कलादानाकरता, मनुष्य विकास लोकसेवा अकादमीने “नारी गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देवून गौरव केला.

महाराष्ट्र राज्यस्तरावर विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी मानकरींची निवड करण्यात आली होती. कला क्षेत्रातून नागपूर येथील प्रा. डॉ. संगीता टेकाडे यांची निवड झाली. जवळ-जवळ ४० वर्षाची कारकिर्द त्यांनी कला क्षेत्रात घालवली आहे. एवढचं नव्हे तर विदर्भात त्यांनी स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण विदर्भात आज त्या एकमेव महिला नकलाकार आहेत. ही खुप मोठी कला क्षेत्रात जमेची बाजू आहे.

कला क्षेत्रात एका महिला कलावंतानी एवढी उंची गाठणे सोपे नाही. दैनंदिन जीवनातील व्यवहारीकरीता पार पाडून येणा-या अडचणीवर मात करीत स्वतः च वेगळ विश्व निर्माण करणं खरच गौरवास्पद आहे. त्यांच्या या सन्माना बद्दल डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, डॉ. नरेश अग्रवाल, प्रा. डॉ. राजेश नाईक, राजेश कुंभलकर, राजेश पुरोहित, योगेश समुंद्रे, भुषण राठी यांनी शुभेच्छा दिल्यात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा