आषाढीची लगबग लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरात, यंदा विक्रमी संख्येने भाविक होणार दाखल

पंढरपुर ९ जुलै २०२२ : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांच पंढरपूरात आगमन होणार आहे. २ वर्षानंतर पायी चालत वारकरी पंढरपूरात दाखल होत असल्याने वारकरी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकरीना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्याची पावले पंढरपुरीत ओढली जाऊ लागतात. आज पालखी पंढरपूरात दाखल दाखल होत आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखींच पंढरपूरात आगमन होणार आहे.

दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल शहारात सात लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. ऐवढ्या मोठ्या संख्येने येतात भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असण्यारा ६५ ऐकर जागेवर भक्तीसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे.

यंदा रेल्वेने ताब्यात असलेल्या ४० एकरचे क्षेत्र देखील प्रशासनाला दीले आहे. यंदा १०५ एकर जागेत ५ लाख भाविकांची मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपार पर्यंत जवळपास ४ लाख भाविक दाखल झाले आहे. सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल ब

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा