तुळापूर, दि. २१ ऑक्टोबर २०२०: छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने व पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी तुळापूर
मध्ये श्री शंभुसाम्राज्य सेना सदस्य वैभव काकडे, यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते व स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून समाधी स्थळाची स्वच्छता करण्यात आली व त्या नंतर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्यात आले आहे.
दर वर्षी वाढदिवसाचा वायफल खर्च टाळून त्या खर्चाची रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी देणार असून माझा प्रत्येक वाढदिवस साध्या पद्धतीनेच साजरा करणार असे वैभव काकडे यांनी बोलतांना आपले विचार व्यक्त केले आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री शंभू राज्यभिषेक सोहळ्याचे प्रमुख शेखर पाटील, मयुर चव्हाण, राहुल सातव,आशिष काकडे, वैभव खांदवे,अक्षय जाधव, जीवन काकडे,अभिजित शिंदे, उपेंद्र जाधव, रवी काकडे गजानन भिसे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर शिंदे