सासवड येथे वीर गोगादेव जन्मोत्सव संपन्न

पुरंदर, दि.१९ ऑगस्ट २०२०: सासवड येथील वाल्मिकी समाजाचा जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा येथील गोगादेव नगरात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निशाण आखाड्याची मिरवणूक न काढता हा सोहळा पार पडला.

मोजक्याच गोगा भाविकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करत हा सोहळा पार पडला. उत्सव मूर्तींची महाआरती , निशाणाची पाच पावली, महाप्रसाद आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. भवानी पेठ निशाण आखाड्याचे वस्ताद रोमिनजी , स्थानिक भगत सुमित राठोड यांसह अन्य भाविकांनी धार्मिक विधी पार पाडले .यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , नगरसेवक विजय वढणे, प्रवीण भोंडे आदींनी या उत्सवाला हजेरी लावली .

जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण , सुनील राठोड ,कैलास चव्हाण ,विकास राठोड . शाम राठोड ,दिपक चव्हाण आदींनी सोहळ्याचे उत्तम संयोजन केले .

समितीचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी आमदार संजय जगताप नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , नगरसेवक वढणे,भोंडे ,सेवानिवृत्त हैपाणीपुरवठा अधिकारी माऊली गिरमे ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दादा भुजबळ ,बँक ऑफ इंडियाचे हेमंत ताकवले आदींचा सत्कार केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा