कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, २६ जुलै २०२३ : छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना ४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा विभाग सचिव एच. सी. गुप्ता व दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी के.एस.क्रोफा आणि के.सी.सामरिया यांना ३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. विजय दर्डा त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांच्यासह इतर आरोपींवरील आरोप या आधीच निश्चित झालेले आहेत.

दोषींना जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी, अशी विनंती सीबीआयकडून करण्यात आली तर प्रकृतीचे कारण देत कमी शिक्षा दिली जावी, असा युक्तिवाद दोषींकडून करण्यात आला. सर्व दोषींविरोधात ठोस पुरावे आहेत. अशा स्थितीत कमी शिक्षेसाठी प्रकृतीचे कारण योग्य असू शकत नाही, असे यावर सीबीआयकडून सांगण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात ९ वर्ष सुनावणी चालली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा