गोल पोस्ट राष्ट्रीय विलीनीकरणाच्या विरोधात आज अनेक बँका संपावर

विलीनीकरणाच्या विरोधात आज अनेक बँका संपावर

पुणे प्रतिनिधी: ऑक्टोबर रोजी देशभरातील अनेक बँकांमध्ये कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियन आणि इंडियन बँक एम्प्लॉईज फेडरेशन या दोन संघटनांनी 24 तास संप पुकारला आहे.
दरम्यान, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि भारतीय कामगार संघटनेशी संबंधित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ऑफिसर आणि त्यास संलग्न बँक संघटनांनी या संपात भाग घेत नसल्याचे सांगितले आहे. बँकिंग क्षेत्रात एकूण 9 युनियन आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयसह अन्य काही बँकांचा असा दावा आहे की या संपाचा बँकेच्या ग्राहकांवर फारसा परिणाम होणार नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version