जेव्हा लता दीदींनी शोएब अख्तरला फोनवर म्हटलं, ‘बेटा, मला आई बोल’

4

मुंबई;9 फेब्रुवारी 2022: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मुंबईतील मुक्कामादरम्यान स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाची आठवण करून दिलीय. लता मंगेशकर यांच्यावर रविवारी संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लता मंगेशकर या महान पार्श्वगायिका मानल्या जातात. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. 6 फेब्रुवारीला लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण देश दु:खाच्या समुद्रात बुडाला होता. देशातील सर्वात प्रतिष्ठित महिलांपैकी एक असलेल्या लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक प्रसिद्ध कलाकार अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.

शोएब अख्तरने लता मंगेशकर यांच्याशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला की तो लता दीदींना भेटण्याच्या इतका जवळ कसा आला. मुंबईत असूनही 2016 मध्ये शोएब अख्तरला लतादीदींना भेटता आलं नाही, याचा त्याने खेद व्यक्त केला. तसेच आपला लतादीदींशी फोनवर झालेल्या संभाषणा विषयी खुलासा केला. या संभाषणा दरम्यान लतादीदींनी शोएब अख्तर ला ‘मला आई बोल’ असं म्हटलं होतं.

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, ‘मी 2016 मध्ये काही कामानिमित्त भारतात आलो होतो. मी लताजींचा मोठा चाहता आहे. मी मुंबईत असल्यानं फोनवर बोलता येत असे. त्या माझ्याशी खूप प्रेमाने बोलल्या. अख्तरने अलीकडंच लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या पहिल्या आवृत्तीत भाग घेतला.

अख्तर म्हणाला, “जेव्हा मी त्यांना ‘लताजी’ म्हणून संबोधलं तेव्हा त्यांनी मला ‘आई’ म्हणायला सांगितलं. मी त्यांची तब्येत, त्यांचा ठावठिकाणा आणि मधल्या सगळ्या गोष्टींची चौकशी केली. त्यानंतर त्या मला म्हणाल्या- ‘बेटा, मी तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी तुझे आणि सचिनचे अनेक सामने पाहिले आहेत. मला क्रिकेट खूप आवडते. तू खूप आक्रमक खेळाडू आहेस आणि तुझ्या स्वभावासाठीही ओळखला जातो, पण त्याचवेळी तू स्वच्छ मनाचा आहेस. कधीही बदलू नकोस, नेहमी असाच रहा.

अख्तरने 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. या 46 वर्षीय क्रिकेटपटूने 46 कसोटी, 163 एकदिवसीय आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. कसोटी सामन्यांमध्ये, अख्तरने 25.69 च्या सरासरीने 178 बळी घेतले, ज्यात 12 पाच बळींचा समावेश आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अख्तरच्या नावावर 24.97 च्या सरासरीने 247 विकेट आहेत. यादरम्यान अख्तरने चार वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा