कोणत्या लोकांनी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस घेऊ नये…?

नवी दिल्ली, २० जानेवारी २०२१: भारतात कोरोना विषाणूचे लसीकरण चालू आहे. आतापर्यंत ६ लाख लोकांना लस देण्यात आली असून, त्याचे दुष्परिणाम सुमारे एक हजार लोकांमध्ये दिसून आले आहेत. गंभीर दुष्परिणामानंतर, ७ पैकी २ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविशिल्ड लस आणि कोव्हॅक्सिन यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये असे सांगितले गेले आहे की कोणत्या लोकांनी ही लस घेऊ नये.

कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या महिलांसह गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना आपल्या फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर कोविशिल्डची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या फॅक्टशीटमध्ये लोकांना सल्ला दिला आहे की, ज्यांना लसच्या कोणत्याही घटकांसह अॅलर्जीची तीव्र समस्या आहे त्यांनी लस घेवू नये.

या लोकांनी टाळावी कोव्हॅक्सिन-

ज्या लोकांमध्ये इम्यून कॉम्प्रमाइज्ड आहे किंवा रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारी औषधे घेतात, अॅलर्जी आहे, ताप आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर आहे किंवा ज्या लोकांचे रक्त पातळ आहे अशा लोकांना कोव्हॅक्सिन देऊ नये.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोव्हॅक्सिन देऊ नये कारण त्यांचा चाचाण्यांदर्म्यान अभ्यास केलेला नाही. या व्यतिरिक्त ज्या लोकांनी कोरोना विषाणूची दुसरी लस घेतली आहे त्यांना देखील कोव्हॅक्सिन देऊ नये. तसेच लस घेण्यापूर्वी इतर गंभीर आरोग्य समस्यांविषयी जाणून घ्या.

या लोकांना सिरम इन्स्टिट्यूट ची कोविशिल्ड लस देऊ नये

कोविशिल्ड मध्ये असलेल्या कोणत्याही पदार्थापासून जर कोणाला ॲलर्जी असेल तर ही लस देऊ नये. या लसित हायड्रोक्लोराईड मोनोहायड्रेट डिसोडियम एसीटेट डायहाइड्रेट आणि पाणी हे दोन पदार्थ आहेत. जर कोविशिल्डच्या पहिल्या डोस नंतर काही दुष्परिणाम दिसून आले तर दुसरा डोस टाळावा.

दोन्ही औषध कंपन्यांच्या फॅक्टशीटमध्ये असे सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती जसे की त्यांची वैद्यकीय स्थिती, ॲलर्जी ची समस्या, ताप, इम्यून कॉम्प्रमाइज्ड किंवा इतर कोणतीही लस घेतलेली असेल तर या सर्व गोष्टी सांगाव्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा