नाणार, बारसू, जैतापूर असे राख करणारेच प्रकल्प आमच्या माथी का?- आदित्य ठाकरे

रत्नागिरी, २४ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्रातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एफ डी आय चा एक सुध्दा नवा पैसा महाराष्ट्रात आणला नसल्याची टीका, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी येथे केली. ठाकरे हे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. चांगले प्रकल्प गुजरात मध्ये नेता आणि नाणार, बारसू, जैतापूर असे राख करणारेच प्रकल्प आमच्या माथी का? असा सवाल देखील त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. पुढे आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि महायुती सरकारवर हि सडकून टीका केली.

संविधान व कायद्याचा बाजूने गेलात तर ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागणार आणि चाळीस गद्दार बाद होणार. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधाना विरोधात काम केले, तर खोके सरकारच्या बाजूने निकाल लागू शकतो. लोकशाही, कायदा आणि संविधानावर आमचा विश्वास असुन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूनेच निकाल लागेल असा ठाम विश्वास युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी भूमिका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडली आहे. त्यामुळे या विषयावर मी अधिक बोलणार नसल्याचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकारांना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा