पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता?: निलेश राणे

पुणे, दि. २० जुलै २०२०: कोविड -१९ संबंधात आढावा घेण्यासाठी काल शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यासंदर्भात बैठक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राम मंदिरावरून असे वक्तव्य केले होते की, सरकारने आधी देशावर असलेल्या कोविड -१९ चे संकट पहावे आणि मग नंतर राम मंदिराकडे लक्ष द्यावे. कारण आता या संकटाकडे लक्ष देणे अधिक प्राधान्याचे काम आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. नितेश राणे यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, पवारसाहेब तुम्ही नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंच्या श्रध्देचा विषय आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास होण्यासारखं काय?

याचबरोबर नितेश राणे यांनी १३०० डॉक्टर आंदोलन करत असल्याच्या मुद्द्यावरून देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी राम मंदिराकडे लक्ष देण्याऐवजी सरकार कडे लक्ष द्यावे. जेणेकरून डॉक्टरांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असे सांगितले. ते म्हणाले की, “राज्यातील १३०० डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.”

याचबरोबर उमा भारती यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की शरद पवार यांनी केलेले हे विधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडलेले नसून ते अप्रत्यक्षपणे प्रभू रामचंद्रांशी जोडले गेलेले आहे. पुढे चिमटा काढत त्या म्हणाल्या की, असे तर नाही ना की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आयोध्या मध्ये येण्यासाठी पवारांची एनओसी म्हणजेच नाहरकत प्रमाणपत्र घ्यावी तर लागणार नाही ना?

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा