वन्य प्राणी जीव विशेष – सर्प

मराठी नाव -: कुकरी
विदर्भ :- कुकरी … (सामान्य लोक दांडेकर)
इंग्लिश नाव -: common kukari snake
शास्त्रीय नाव -: Oligodan arnensis

सरासरी लांबी -: ३५ सें.मी. ( १ फुट २ इंच )
अधिकतम लांबी -: ७५ सें.मी. ( २ फुट ५ इंच )

रंग व आकार -: रखाडी किंवा लालसर तपकिरी शरीर, शरीरावर साधारण २० काळे किंवा गडद तपकिरी रंगाचे आडवे पट्टे. डोक्यावर इंग्रजी व्ही आकाराची खूण , गोलाकार शरील,डोळ्यांची बाहुली गोल व शेपूट आखूड.

प्रजनन -: मादी ३-९ अंडी घालते व त्यातून महाराष्ट्रात मार्च-जुलै मध्ये पिल्ले बाहेर पडतात. मार्च -मे दरम्यान मादी ८-१२ अंडी घालते.

खाद्य -: मुख्यतः सरपटणा-या प्राण्यांची अंडी,पाली,सापसुरळ्या,उंदीर व लहान असताना किटक व अळ्या.

आढळ -: हा साप काश्मीर व उत्तर-पूर्व भाग सोडून भारतात सर्वत्र आढळतो.

वास्तव्य -:ब-याचदा वारुळ, दगडांची सापट, झाडाच्या ढोली,पडक्या भिंतीे,विटांची ढिगारे तसेच मानवी वस्ती.

वैशिष्ट्ये -: निशाचर , दिवसा विश्रांती घेऊन रात्रीला भक्षासाठी बाहेर पडतो. लाजाळू सहसा चावत नाही.

संदर्भपुस्तक -: साप, गुरुवर्य (निलीमकुमार खैरे)

टीप

विनंती :- बिनविषारी जातीचा कुकरी साप व विषारी मण्यार साप यांतील फरक लोकांना स्पष्टपणे समजून येत नाही, म्हणून बिनविषारी असलेल्या या सापाचा नाहकच बळी जातो. आपल्या घरांत किंवा आपसासच्या जागेत साप वा इतर पशु-पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास त्यास पकडायचा प्रयत्न न करता जवळच्या सर्पमित्रांस बोलवा किंवा हँलो फाँरेस्ट(१९२६)
वर काँल करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी:सर्पमित्र जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा