नगरमध्ये कोरोनाबरोबर स्वाइन फ्लूचेही रुग्ण

अहमदनगर : नगरमध्ये कोरोनासह स्वाईन फ्ल्यूने देखील डोकेवर काढले आहे. कोरोना विषाणुच्या संशयावरून पुणे येथे तपासणीसाठी पाठविलेल्या १७ नमुन्यांपैकी एकाचा नमुना स्वाईन फ्ल्यू पॉझिटिव्ह आला आहे. या परिस्थितीमुळे नगरच्या आरोग्य प्रशासनाला कोरोनासह स्वाईन फ्ल्यू या दोन्ही विषाणुंचा सामना करावा लागणार आहे.

नगरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पुण्यात १७ संशयितांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते.
त्यातील ८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत, पण त्यातील एकाचा अहवाल हा स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
नगर शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर प्रशासकीय पातळीवर आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहे. उर्वरित नऊ जणांचे अहवाल प्राप्त होतील, असे ही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा