कुस्तीपटू दीपक पूनियाला रुग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२०ः राष्ट्रीय शिबिरामध्ये कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपचा रजत पदक विजेता खेळाडू कुस्तीपटू दीपक पुनिया याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि सध्या घरीच राहण्यास सांगितले आहे.
ऑलिम्पिक साठी पात्र ठरलेल्या ८६ किलो ग्रॅाम वजनी गटाच्या दीपक पुनियासोबत ६५ किलो वजनी गटातील नवीन आणि १२५ किलोग्राॅम वजनी गटातील कृष्णा यांना ही कोरोनाची लागण झाली होती. हे तिघेही खेळाडू सोनीपत येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया येथे राष्ट्रीय शिबिराचा भाग होते.
ही माहिती साईने ट्विटर वरून दिली होती, “राष्ट्रीय शिबिरासाठी सोनीपत येथे आलेल्या दीपक पुनिया पॉझिटिव्ह आले आहे आणि ते रुग्णालयात होते. तसेच आता डॉक्टर्सने त्यांना काही दिवस घरीच राहण्याची सक्ती केली आहे. आता त्यांची स्थिती स्थिर आहे ,आता त्यांच्यात कोणतेही कोव्हीड १९ चे लक्षणं नाही. विश्व  चॅम्पियनशीप मध्ये रजत पदक मिळवणारे दीपक पुनिया हे टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय झाले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तसेच नियमानुसार शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडू, कोच आणि स्टाफ यांची आरटी – पी. सी आर चाचणी केली गेली होती जेणेकरून कोव्हीड १९ बद्दल माहिती मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा