पैलवान महिंद्र गायकवाड ठरला अर्धा किलो सोन्याच्या गदेचा मानकरी

8

अहमदनगर, २४ एप्रिल २०२३: अहमदनगर जिल्हात राज्यातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धाच्या अंतिम लढतीमध्ये झालेल्या सामन्यात महेंद्र गायकवाड ने एकहाती विजय मिळवत छत्रपती शिवराय केसरी कुस्ती २०२३ होण्याचा मान मिळवला.

अंतिम सामान्य मध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये चुरशीची लढत होत असताना सर्व मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलं होतं. या सामन्या साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार राम शिंदे, तसेच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. पण अंतिम लढत सुरु होताच दोन्ही पठ्ठे एकमेकांना गुण मिळवून देण्याची संधी देत नव्हते. दोघेही आपली वर्षेभर केलेली मेहनत पणाला लावत होते. डाव प्रतिडाव झाले पण काही मिनिटातच महिंद्र गायकवाड यांच्या एका डावाने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे पंचांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले. व पहिल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती ’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महेंद्र गायकवाड याला अर्धा किलो सोन्याची गदा प्रदान करण्यात आली.

तत्पूर्वी शिवराय केसरी २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि मॅट विभागातील उपांत्य फेरीमध्ये माती विभागातील महाराष्ट्राचा नामवंत पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महिंद्र गायकवाड यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर महिंद्र गायकवाड सिकंदर शेख वर भारी पडत फायनल मध्ये धडक मारली.
तर मॅट विभागातून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि माऊली कोकाटे यांच्यामध्ये पार पडली ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराज राक्षे सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर माऊली कोकाटे ला चित्तपट करत फायनलमध्ये प्रवेश केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा